कासारवाडीत परिक्षेच्या भीतीने पळून गेलेल्या मुलाचा भोसरी पोलिसांनी लावला शोध

0
570

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – शाळेतल्या परीक्षेच्या भीतीने घरातून पळून गेलेल्या एका पाचवीतल्या विद्यार्थाचा भोसरी पोलिसांनी अवघ्या पाच तासात शोध घेऊन त्याला सुखरुप त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले.  ही घटना रविवार (दि.२४) कासारवाडी येथे घडली.

कौस्तुभ असे सुखरुप घरी पोहचवण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौस्तुभ इयत्ता ५ वीत शिकतो. त्याची आज (सोमवार) शालेय परीक्षा होती, याचीच मनात धास्ती घेऊन तो रविवारी (दि.२४) घरातून पळून गेला होता. यामुळे त्याच्या घरातील सदस्य खूप घाबरले होते. परिसरात सर्वत्र त्यांनी कौस्तुभचा शोध घेतला, परंतु तो भेटत नसल्याने अखेर त्यांनी भोसरी पोलिसत धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी जलद गतीने तपास करत कासारवाडी आणि शहरपरिसरातील तब्बल २० सीसीटीव्हींचे फुटेज तपासले आणि कौस्तुभचा शोध घेतला.  रात्री पाऊणे आठच्या सुमारास कौस्तुभला पोलिसांनी शोधले आणि त्याला सुखरुप त्याच्या घरी पोहचवले.

ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली विधाते, महाडीक,रासकर,देवकर,गोपे,साळवे आणि फुले यांच्या पथकाने केली.