काळेवाडी- पिंपरी व पवनेश्वर पूल २३ पर्यंत सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद; कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीसांचा निर्णय

0
279

पुणे दि.17 (पीसीबी): – वाकड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील थेरगाव परिसरात पडवळनगर, सुंदर कॉलनी, गणराज कॉलनी, दगडुपाटिल नगर, क्रांतीवीर नगरच्या भागात कोरोना विषाणू बाधिक लोक मिळुन आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 14 जुलै ते 23 जुलै 2020 या कालावधीमध्ये लॉकडाऊन जाहिर करण्यात आलेला आहे.

त्यानुसार यापुर्वीचे निर्बंध रद्द करण्यात येऊन आता अत्यावश्यक सेवेतील वाहने ( उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, वैद्यकीय सेवेतील स्टाफ, इ) खेरीज तात्पुरत्या स्वरुपातील आदेशानुसार पिंपरी सांगवी वाहतुक विभागांतर्गत कोरोना रोगाचे वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता काळेवाडी- पिंपरी या दोन गावांना जोडणारे पुल अनुक्रमे काळेवाडी पिंपरी पुल लकी बेकरी जवळ तसेच पवनेश्वर काळेवाडी या पुलावर सार्वजनिक वाहतुकीकरीता 14 जुलै 2020 ते 23 जुलै 2020 या कालावधीपर्यंत बंदी करण्यात आल्याची माहिती, पिंपरी- चिंचवड वाहतुक शाखेचे पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.