काळेवाडीत दिवसाढवळ्या कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल केला लंपास

0
442

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – मित्रासोबत पायी चाललेल्या एका तरुणाला तिघा जणांच्या टोळक्यांनी अडवले. तसेच त्या दोघांना कोयत्याचा धाक दाखवून एकाकडील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. ही घटना काळेवाडी येथील लकी बेकरी समोर घडली.

याप्रकरणी शकिल महम्मद अखिल शेख (वय १९, रा. तापकीर मळा चौक, काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि.२०) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास फिर्यादी शकिल हा त्याच्या मित्रासोबत लकी बेकरी समोरील रस्त्यावरुन पायी चालला होता. यावेळी तिघा चोरट्यांनी त्यांचा रस्ता अडवला. तसेच कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली आणि शकिल याच्या खिशातील १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्ती हिसकावून नेला. वाकड पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.