काळेवाडीत चाकुचा धाक दाखवून ३५ तोळ्याचे दागिणे चोरट्यांनी पळवले

0
566

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – पहाटे पाणी भरण्यासाठी उठलेल्या महिलेला चौघा चोरट्यांनी चाकूचा धाख दाखवून तसेच तिच्या दोघा मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन ८ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिणे आणि १ लाख २५ हजारांची रोख असा एकुण १० लाखांचा ऐवज जबरदस्ती चोरुन नेला. ही घटना सोमवारी (दि.२२) सकाळी चारच्या सुमारास काळेवाडी ज्योतीबानगर येथील समता कॉलनीत घडली.

याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या काळेवाडी ज्योतीबानगर येथील समता कॉलनीत राहतात. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्या पाणी भरण्यासाठी उठल्या होत्या. यावेळी चार अज्ञात चोरट्यांनी त्यांना चाकुचा धाक दाखवून तसेच त्यांच्या दोन मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन ८ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिणे आणि १ लाख २५ हजारांची रोख असा एकुण १० लाखांचा ऐवज जबरदस्ती चोरुन नेला. वाकड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.