आकुर्डीत सव्वाचार लाखांची रोख चोरट्यांनी केली लंपास

0
521

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – घर कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने कुलुप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेली ३ लाख ४८ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. ही घटना सोमवारी (दि.२२) दुपारी पावणेतीन ते पावणेचार दरम्यान आकुर्डी गणेशनगरी येथील ए विंगमधल्या फ्लॅट नं.५ मध्ये घडली.

याप्रकरणी सुबोध दिनकर अभ्यंकर (वय ३४, रा. फ्लॅट नं.४, ए विंग, गणेशनगरी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुबोध अभ्यंकर यांचे आकुर्डी गणेशनगरी येथील ए विंगमध्ये फ्लॅट नं.५ त्यांच्या मालकिचा आहे. सोमवारी दुपारी पावणेतीन ते पावणेचार दरम्यान त्यांचे घर कुलुप लावून बंद होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तसेच बेडरुममधल्या कपाटात ठेवलेली ३ लाख ४८ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. निगडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.