कारवाई करण्यासाठी अडविल्याने पोलिसांना मारहाण; तिघांना अटक

0
437

डुडुळगाव, दि. ७ (पीसीबी) – कारवाईसाठी अडविल्यामुळे तीन जणांनी पोलिसांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सायंकाळी डुडुळगाव येथे घडली.

सागर बाळु गावडे (वय 28), सहजानंद निजानंद गावडे (वय 26) आणि सुरेश उत्तम कातडे (वय 30, तिघेही रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस कर्मचारी हरिराम तुळशीराम डुमनर यांनी गुरुवारी (दि. 6) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर दिघी पोलीस डुडुळगाव येथे कारवाई करीत होते. त्यावेळी (एमएच 14 / जेएल 919) या टेम्पोला गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास डुडुळगाव जकात नाका येथे कारवाईसाठी थांबविले. यामुळे संतापलेल्या आरोपींनी तुम्हाला कारवाईसाठी आम्हीच दिसतो का, फक्‍त आमच्याच पावत्या का करतात. आमच्यावर कारवाई करणारे तुम्ही कोण, अशी विचारणा करीत पोलिसांना धक्‍काबुक्‍की आणि मारहाण केली. तसेच दगड घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून आले. तसेच पोलीस करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.