‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही फोन टॅप झाला होता’

0
162

मुंबई, दि.२० (पीसीबी) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही फोन टॅप झाल्याचा दावा राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप करुन हेरगिरी केल्याचा आरोप काँग्रेससह विरोधकांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केला आहे. विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले. यावरच महाराष्ट्रातील नेत्यांचे फोन टॅप झाल्याचा दावा थोरातांनी केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “नाना पटोले यांचेही फोन 2017-18 मध्ये टॅप झाले होते. आता जे प्रकरण देशपातळीवर समोर येतंय ते गंभीर आहे. कारण यामुळे आपल्या देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडेही जाऊ शकते” 12 आमदारांबाबत राज्यपालांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यातील लोकांच्या मूलभूत हक्कावर गदा आहे. कारण महाराष्ट्रातील प्रश्न या 12 आमदारांमार्फत सभागृहात मांडले गेले असते, ते सोडवले गेले असते. याबाबत हायकोर्टापुढे विषय चालू आहे. पण कोर्टात जाण्याची वेळ येणं हेही दुर्दैव आहे. माननीय राज्यपालांना हा निर्णय लवकर देणे उचित राहील, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुंबई विमानतळाचा कारभार अहमदाबादला हलवण्याचा प्रकार सुरु आहे. याबाबत थोरात म्हणाले, “2014 नंतर मुंबईतील अनेक महत्त्वाच्या गोष्टी गुजरातला कशा नेता येतील हा प्रयत्न सुरू आहे. असं केल्याने मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही. उद्योगांसाठी अजूनही महाराष्ट्राचं आकर्षण आहे. राज्यातील वातावरण, सुरक्षितता, यामुळे उद्योग आपल्याकडे येतात”

केंद्र सरकारकडे हा डाटा आहे, ती जनगणना मिळावी यासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी राज्य सरकारने ठेवली आहे, पण तो डाटा सहज मिळावा असं वाटतं. तो मिळाला नाही तर राज्य मागासवर्ग आयोगातर्फे हे काम सुरू आहे, असं थोरातांनी सांगितलं. ज्याच्या फोनला हॅक करायचं असतं त्याच्यात पेगासस इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. त्यातला एक मार्ग असाही आहे की, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे, त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. जसही त्या लिंकवर यूजर क्लिक करतो. पेगासस आपोआप इन्स्टॉल होतं. 2019 ला हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन फोनध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होतं, त्यावेळेस एक वेगळीच पद्धत अवलंबली होती. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक उणीव(BUG) शोधून काढली आणि त्याचाच फायदा घेत हॅकर्सनी नकली व्हाटस अप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. त्याच दरम्यान एका कोडद्वारे पेगाससला फोनमध्ये इन्स्टॉल केलं.