काँग्रेसने सन्मानाने उमेदवारी दिल्यास पुण्यातून लोकसभा लढवणार – संजय काकडे

0
2129

पुणे, दि. ३१ (पीसीबी) – जर काँग्रेसने सन्मानाने उमेदवारी दिली, तर पुण्यातून लोकसभा लढवणार’,  असे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे. तसेच भाजपसाठी मी तन- मन-धन दिले तरी, माझा विचार का होत नाही’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय काकडे  म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून आपण लायक उमेदवार आहोत. पुणे महापालिका निवडणुकीचे गिरीश बापट हे मुळीच शिल्पकार नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बापट विरुद्ध काकडे हा सामना खरेच व्हावा, यासाठी मी उत्सुक आहे, असेही काकडे म्हणाले.

भाजप पक्षासाठी तन-मन-धन दिले, तरी माझा विचार का होत नाही, याचे दुःख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझा सन्मान राखतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी घेतलेल्या भेटीबद्दल काकडे म्हणाले की,  मी छगन भुजबळ यांना भेटलो होता. कारण , पुण्यात मला ओबीसी समाजाची गरज आहे. मात्र, मी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राजकीय हेतूने भेटलो नाही, असे काकडे यांनी यावेळी सांगितले.