काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटलांचे पुत्र डॉ.सुजय भाजपच्या वाटेवर ?

0
1151

अहमदनगर, दि. २६ (पीसीबी) –  माझे वडील जरी काँग्रेसचे नेते असले, तरी मला माझा पक्ष निवडीचा अधिकार आहे, असे सुचक विधान विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सुजय भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  

डॉ. सुजय विखे-पाटील अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने तिकीट देवो अथना न देवो मी लोकसभेची निवडणूक लढविणारच असल्याचे सुजय यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

माझे वडील जरी काँग्रेसचे नेते असले, तरी मला मला माझा पक्ष निवडीचा अधिकार आहे. मला स्वतंत्र नेतृत्त्व मान्य असेल, तर मी त्या नेतृत्त्वाकडे जाईन. त्यास माझ्या कुटुबाचा विरोध असला तरीही मी माझा निर्णय घेईन. वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून मी काँग्रेसमध्ये राहिले पाहिजे, असे मला वाटत नाही, असे डॉ. सुजय यांनी म्हटले आहे.