कर दिलासा: पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ; बचत केल्यास साडेसहा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

0
730

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या  अर्थसंकल्पात हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा   केली आहे . मध्यमवर्गीय करदात्यांना खूश करण्यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांवरून थेट पाच लाखांवर नेली आहे.  या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोदी सरकारच्या वतीने आज  (शुक्रवार) संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.  सकाळी अकरा वाजता हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला.

करदात्यांसाठी  ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले जाईल, अशी शक्यता होती. मात्र, करमुक्त उत्पन्न मर्यादा आणणे सरकारला परवडण्यासारखे नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे होते. मात्र, यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे असल्याने अर्थमंत्र्यांनी  सर्वसामान्यांना निवडणुकीपूर्वी भेटच दिली आहे.  ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त  करून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, प्रॉव्हिडंट फंड आणि निर्धारित इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास साडेसहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. मात्र, गुंतवणूक केली नसल्यास करदात्यांना प्राप्तिकर भरणे बंधनकारक असणार आहे.