कधीही सुट्टीवर जाणारा की,१८-१८ तास काम करणारा प्रधानसेवक हवा; ते तुम्हीच ठरवा – पंतप्रधान मोदी

0
419

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – देशाला गरज असताना कधीही सुट्टीवर जाणार प्रधानसेवक हवा की, १८-१८ तास काम करणारा प्रधानसेवक तुम्हाला हवा, ते तुम्हीच ठरवा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) येथे म्हटले आहे. चोर देशात असो किंवा विदेशात चौकीदार एकालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोदी बोलत होते.