ओम साई अँम्ब्युलन्स सर्व्हिसेसचा चिपळूणकरांना मदतीचा हात; पूरग्रस्तांसाठी स्वखर्चातून करणार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0
420

पिंपरी, दि.०४ (पीसीबी) : महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं ज्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं. चिपळूण मध्ये सुद्धा जोरदार पावसामुळे अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली . आणि यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील ओम साई अँम्ब्युलन्स सर्व्हिसेस या पुरग्रस्तांच्या मदतीला धावून आली आहे. ओम साई अँम्ब्युलन्स सर्व्हिसेस आपल्या स्वखर्चातून चिपळूण मधील या पूरग्रस्तांना मदत करणार आहे. ज्या भागामध्ये गरजूंना अजूनही मदत पोहचली नाहीये त्या भागामध्ये जाऊन औषधे, कपडे, धान्य आणि पाणी वाटप करणार आहेत. यामध्ये, चिराग मित्तल, कृष्णा सूर्यवंशी, ज्योतिबा शिंदे, राकेश चंदनशिव, अक्षय चिमले, नरेश जोशी आणि त्यांचा मित्रपरिवार हि मदत घेऊन स्वतः चिपळूणला उद्या रवाना होणार आहेत. हि मदत चिपळूण मधील स्थानिक माध्यमं, आणि स्थानिक पोलीस यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली चिपळूणकरांना केली जाणार असल्याचं चिराग मित्तल यांनी सांगितलं.