ओमिक्रॉन व्हेरियंट, कोरोना रुग्णवाढीबाबत आवश्यक उपाययोजना करा – संजोग वाघेरे‌ पाटील

0
208

पिंपरी, दि. 3 (पीसीबी) -कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण, तसेच कोरोनाचे रुग्ण देखील पिंपरी चिंचवड शहरामध्ये आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महपालिका प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. नागरिकांची गैरसोय होणार नाही. त्यांना वेळत आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळतील, याचे नियोजन करावे, अशी मागणी ष्ट्वादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे‌. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणुच्या पहिल्या आणि दुस-या लाटेनंतर आता नव्याने ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटबरोबर कोरोना रुग्णसंख्या देखील वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या प्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात देखील प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. रेमडेसिवीर औषधे, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. खासगी रुग्णालयांमध्ये भरमसाठ बिले आकरून रुग्णांची लूटीचे प्रकार घडले. ही परस्थिती उद्भवणार नाही. यासाठी आतापासून महापालिकेच्या यंत्रणेने सर्व प्रकारची खबरदारी घेणे अपेक्षित आहे.

वैद्यकीय विभागाची यंत्रण सज्ज ठेवण्य़ात यावी. नवीन भोसरी रुग्णालयाप्रमाणे जिजामाता, थेरगाव, आकुर्डी आणि तालेरा ही नवीन रुग्णालये कार्यन्वित झाली आहेत. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्यात आलेले आहे. या ठिकाणी रुग्णांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील. याचे तातडीने नियोजन महापालिका वैद्यकीय विभागामार्फत करण्यात यावे. या नागरिकांच्या कोरोना संबंधित चाचण्या, तसेच गृहविलगीकरण अथवा उपचाराच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, गर्दीवर निर्बंधाचे पालन होईल याची दक्षता घेण्यात यावी. औषधे, ऑक्सिजनचा साठा मुबलक ठेवावा. अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्यांचे घरोघरी जाऊन लसीकरण पूर्ण करावे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.‌