ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचे माजी खेळाडू डॅन जोन्स यांच मुंबईत हार्ट अटॅकमुळे निधन

0
287

मुंबई,दि.२४(पीसीबी) : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा माजी खेळाडू डॅन जोन्सचं मुंबईत हार्ट अटॅकमुळे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 59 होते. सुत्रांच्या माहितीनुसार हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला. डीन जोन्स यांनी अनेक देशांच्या क्रिकेट टीमसाठी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. डीन यांनी ऑस्ट्रेलियासाठी टेस्ट आणि वनडे क्रिकेट खेळलं आहे. त्यांच्या नावावर टेस्ट क्रिकेट प्रकारात अनेक रेकॉर्ड आहेत. जोन्स वनडेमध्ये आपल्या बॅटींग आणि फील्डिंग प्रसिद्ध होते. जोन्स सध्या आयपीएल समालोचनाच्या निमित्तानं मुंबईत होते. काल रात्री कोलकाता-मुंबई सामन्यात जोन्स यांचं समालोचन होतं.

80 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90 च्या दशकाच्या प्रारंभी डीन जोन्सला जगातील सर्वोत्तम वन डे फलंदाजांपैकी एक मानले जात असे. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज या दोघांविरूद्ध तो सर्वोत्कृष्ट फलंदाज होता. विकेट्स दरम्यान धावण्याच्या बाबतीत तो आश्चर्यकारक मानला जात असे. 2019 मध्ये त्याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले होते. डीन जोन्सच्या निधनानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.