एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या खुशांश चिगाटे याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद..

0
465

पिंपरी,दि. 23 (पीसीबी) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा पहिलीती विद्यार्थी खुशांश चिगाटे याने एका मिनिटात 181 वेळा हुला – हुप फिरविण्याचा विक्रम केला. त्याच्या या अनोख्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली. पीसीईटी आणि एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच क्रीडा, सांस्कूतिक कलागुणांना योग्य संधी मिळावी म्हणून प्रयत्न करीत असते.

स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी आणि खुशांश चिगाटेचे वडील दिनेश चिगाटे, त्याचे मार्गदर्शक, शाळेतील क्रीडा शिक्षक आणि खुशांशची इच्छाशक्ती यामुळे तो कमी वयात हा विक्रम करु शकला त्याच्या या विक्रमामुळे इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळेल असे सत्कार प्रसंगी पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले म्हणाल्या. खुशांशचे सहा वर्ष, दोन महिने आणि सत्तावीस दिवस एवढे वय असताना हा विक्रम केला.
       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांनी खुशांश चिगाटे याचे अभिनंदन केले