एमआयटीच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती करण्यात यश

0
233

पुणे, दि. २५ (पीसीबी) : एमआयटीच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये इलेक्ट्रिक सायकलची निर्मिती करण्यात यश आले आहे. एका चार्जिंगमध्ये ही सायकल सुमारे ७० ते ७५ किमी धावते. इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असताना इलेक्ट्रिक सायकल हा सक्षम पर्याय आहे. व्यायामप्रेमींसह डिलिव्हरी बॉईज, विद्यार्थी यांच्यासाठी ही सायकल उपयुक्त ठरणार आहे..

पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. संचालिका शीतल साठे, मुख्य व्यापार अधिकारी कैलास थोरात यांनी आदी या वेळी उपस्थित होते. सिटी सायकलचे मूल्य ३५ हजार ८८०, तर ब्लॅक पर्ल सायकल ४८ हजार ८८० रुपये आहे. डॉ. जोशी म्हणाले, इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असताना इलेक्ट्रिक सायकल हा सक्षम पर्याय आहे. व्यायामप्रेमींसह डिलिव्हरी बॉईज, विद्यार्थी यांच्यासाठी ही सायकल उपयुक्त ठरेल. गेली तीन वर्षे या सायकलचे संशोधन सुरू होते.

बाजारात उपलब्ध असलेल्या ई सायकलपेक्षा या दोन प्रारुपांच्या किंमती कमी आहेत. तसेच गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड करण्यात आलेली नाही. या सायकलचे वेगळेपण म्हणजे ग्राहक अतिरिक्त बॅटरी सोबत ठेवू शकतो, बॅटरी काढू शकतो. पहिल्या शंभर ग्राहकांत लकी ड्रॉ काढून तीन ग्राहकांना मोफत सायकल दिली जाईल. तसेच जुनी सायकल दिल्यास पाच हजारांपर्यंत सूट दिली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.