एमआयएममधून हकालपट्टी झालेला नगरसेवक मतीन सैय्यद यांच्यासह तिघांवर चाकण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा

0
764

चाकण, दि. १२ (पीसीबी) – एमआयएममधून हकालपट्टी झालेला नगरसेवक सय्यद मतीन विरोधात चाकण पोलीस ठाण्यात एका २७ वर्षीय महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा शनिवार (दि.११) दाखल करण्यात आला असून सध्या मतीन सय्यद हा अणखी एका बलात्कार प्रकरणात औरंगाबाद येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मतीन रशीद सैय्यद, हमीद सिध्दकी आणि मोहसीन रशीद सय्यद या तिघा आरोपींनी २६ नोव्हेंबर २०१८ ते २४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत २६ वर्षीय महिलेसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेतला. तसेच महिलेची आई आजारी असल्याचे सांगून महिलेला कारमधून औरंगाबाद येथे नेले. तेथे गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आणि कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या. याप्रकरणी पिडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या मतीन सय्यद हा अणखी एका बलात्कार प्रकरणात औरंगाबाद येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे. तर त्याचे दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.