एच ए मैदानातील अजय नागोशेच्या खूनाचा उलगडा झाला; पैशांच्या वादातून मित्रानेच केला खून

0
897

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – नेहरुनगर येथील एच ए मैदानात डोक्यात दगड आणि सिमेंटचा गट्टू मारुन त्यानंतर पेटवून देऊन रविवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास अजय राजेश नागोसे (वय १९, रा. गांधीनगर) या तरुणाचा खून झाला होता. पिंपरी पोलिसांनी दोन दिवसात या खूनाचा छडा लावला असून मित्रासोबत झालेल्या पैशांच्या वादातून त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी अक्षय दिनकर राऊत (वय २५, रा. गांधीनगर, पिंपरी) याला अटक केली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अजय आणि अक्षय हे दोघे मित्र होते. काही दिवसांपूर्वी अक्षय याने अजयकडून अडीच हजारांची रक्कम उसनी घेतली होती. मात्र बरेच दिवस उलटून देखील अक्षयने ती रक्कम अजयला परत केली नव्हती. यामुळे अजयने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. शनिवारी (दि.२१) च्या रात्री आरोपी अक्षय आणि अजय हे सोबतच होते. ते नेहरुनगर येथील एच ए मैदानातून घरी निघाले होते. यावेळी त्यांच्यात पुन्हा पैशावरुन वाद झाला आणि अक्षय याने अजयच्या डोक्या सिमेंटचा गट्टू आणि दगड मारुन खून केला. तसेच त्याचा मृतदेह पेटवून देत फरार झाला.

रविवारी सकाळी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या मुलांना हा प्रकार दिसला. त्यांनी त्वरीत पोलिसांना याबाबत माहिती दिली. तो पर्यंत अजयचा मृतदेह पूर्णपणे जळालेला होता. तसेच कुत्र्यांनी त्याच्या मृतदेहाचे लचके तोडले होते. पोलिसांना तपासा दरम्यान घटनास्थळावरुन अजयचा मोबाईल सापडला त्यातून त्याची ओळख पटली. यानंतर आठ ते दहा संशीयत ताब्यात घेण्यात आले. मात्र सीसीटीव्हीत आढळून आलेल्या आरोपी अक्षय याची ओळख पटत नव्हती. मात्र मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याचा छडा लावून अक्षयला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.