एक्झिट पोलपाठोपाठ सट्टाबाजाराचाही भाजपला कौल

0
454

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – सातव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीतील मतदान पार पडल्यानंतर बहुतांश एक्झिट पोलने केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार सत्तेवर येईल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानंतर आता देशभरातील सट्टा बाजारानेही भाजपलाच सत्ता स्थापनेसाठी पहिली पसंती दिली आहे.  मात्र, या निवडणुकीत भाजपच्या  जागांमध्ये घट होईल, असा अंदाजही सट्टा बाजाराने वर्तवला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला  २४२ ते २४५ जागा मिळतील, असे राजस्थानमधील सट्टा बाजाराने म्हटले आहे. तर २३८ ते २४१ जागा मिळण्याचा अंदाज दिल्लीतील सट्टा बाजाराने वर्तवला आहे. मात्र,  एनडीए ३०० पेक्षा अधिक  जागा मिळतील,  असा दावा  मुंबईतील सट्टा बाजाराने  केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील  युपीएला केवळ  १५० जागा मिळतील,  असा अंदाज मुंबईच्या सट्टाबाजारात वर्तवला आहे. तर देशातील व्यावसायिकांनीही पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा  मोदी यांनाच पहिली  पसंती दिली आहे.

दरम्यान, सट्टा बाजारात भाजपच्या पराभवावरही पैसा लावण्यात आल्याचे चित्र दिसून आले आहे.  भाजपचा पराभव झाल्यास नुकसान भरपाई निघून जाईल, असे सट्टा बाजाराला वाटत आहे.  २०१४ मध्ये सट्टाबाजांनी  भाजपच्या विजयावर मोठ्या प्रमाणावर पैसा लावला होता.  मात्र, अपेक्षेपेक्षाही  जादा जागा  भाजपला  मिळाल्या होत्या. त्यामुळे सट्टेबाजांना मोठा फटका बसला होता.  त्यामुळेच यंदा  एनडीएच्या पराभवावरही पैसा लावण्यात आला आहे.