कात्रजमध्ये कोयत्याने वार करुन रिअल इस्टेट एजंटचा खून

0
621

पुणे, दि. २१ (पीसीबी) – एका रिअल इस्टेट एजंटचा कोयत्याचे सपासप वार करुन खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.२०) रात्री कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावर असलेल्या फार्म हाऊसमध्ये घडली.

अजयकुमार सीताराम जैस्वाल (वय ४५, रा. कोथरुड) असे खून झालेल्या इस्टेट एजंटचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील सच्चाई माता डोंगरावर जैस्वाल यांचे फार्म हाऊस आहे. सोमवारी रात्री ते फार्म हाऊसवर असताना अज्ञात मारेकऱ्यांनी कोयत्याचे वार करुन त्यांचा खून केला. खून केल्यानंतर आरोपींनी फार्म हाऊसचे दरवाजे बाहेरून बंद करून पळ काढला. जैस्वाल हे कॉल घेत नसल्याने त्यांचा नोकर सच्चाई माता डोंगरावरील फार्म हाऊसवर आला. नोकर फार्म हाऊसवर पोहोचल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.