एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्या मुळे मी अशी चूक करणार नाही – अमृता फडणवीस

0
276

मुंबई,दि.१२(पीसीबी) – एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्या मुळे मी अशी चूक करणार नाही, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“अमृता फडणवीस यांनी व्यवहार केल्यास पती देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का?” अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हल्लाबोल केला होता. खडसेंच्या प्रश्नाला आता अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले आहे.

“तुम्ही खात्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप काही शिकल्यामुळे मी अशी चूक करणार नाही! सर्वांचे भले होवो !” असे उत्तर अमृता फडणवीस यांनी ट्विटर वरून दिलं आहे.

दरम्यान “एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत” असं खडसे म्हणाले होते.