उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब ?

0
551

मुंबई,दि.२१(पीसीबी) – येत्या आठवडाभरात महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता आहे. महाशिवआघाडीचा फॉर्म्युला देखील निश्चित झाला असल्याची माहिती आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर काँग्रेसचा उपमुख्यमंत्री असेल. काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरात यांचं नाव आघाडीवर आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या नावावर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केल्याची देखील माहिती समजत आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावांना पाठीमागे टाकून थोरात यांचं नाव आघाडीवर आहे.

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार आहे. या पदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. हे दोन्ही नेते या अगोदर मुख्यमंत्री राहिल्याने त्यांची उपमुख्यमंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे.