उत्तर कोरियामधील ‘रहस्यमयी हॉटेल’; ज्याच्या पाचव्या मजल्यावरती जायला आहे मनाई

0
560

हुकूमशहा किम जोंग याचा शासित प्रदेश असलेल्या उत्तर कोरियामध्ये अनेक रहस्ये आहेत. कारण, या देशातील लोकांना त्यांचा देश सोडून बाहेरच्या देशांमध्ये काय चाललं आहे याची पुसटशीही कल्पना नसते. उत्तर कोरिया हा जगभरातील एक रहस्यमय देश मानला जातो. सहसा आपण हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर जाऊ शकतो किंवा आपली खोली बुक करू शकतो. पण उत्तर कोरियामध्ये एक असे हॉटेल आहे जिथे कोणालाही पाचव्या मजल्यावर जाऊ दिले जात नाही. तिथे जाण्यास सक्त मनाई आहे. त्यामागे एक छुपे रहस्य दडलेले आहे.

वास्तविक, उत्तर कोरियामध्ये असलेल्या या हॉटेलचे नाव यंगाकडो हॉटेल आहे. हॉटेल उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे आहे. यंगाकडो हॉटेल हे उत्तर कोरियामधील सर्वात मोठे हॉटेल तसेच येथील तेथील सर्वात उंच इमारतींमधील एक आहे. ते यांगक बेटावर वसलेले आहे, ते ताएडॉन्ग नदीच्या मध्यभागी आहे.

४७ मजली यंगाकडो हॉटेलमध्ये एकूण १००० खोल्या आहेत. यात चार रेस्टॉरंट्स, एक बॉलिंग एले आणि मसाज पार्लर देखील आहेत. हे हॉटेल उत्तर कोरियामधील पहिले लक्झरी हॉटेल आहे, खोलीचे भाडे सुमारे 25 हजार रुपये आहे. हे हॉटेल संपूर्ण तयार होण्यास सहा वर्ष लागली. त्याचे बांधकाम १९८६ मध्ये सुरू झाले आणि १९९२ मध्ये ते पूर्ण झाले. हे फ्रान्सच्या कॅम्पनॉन बर्नार्ड कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधले होते, जे सन १९९६ मध्ये सर्वसामान्यांसाठी उघडले गेले.

यंगाकडो हॉटेलशी संबंधित सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या हॉटेलच्या लिफ्टमध्ये पाचव्या मजल्यावर जाण्यासाठी बटण नाही. याचा अर्थ स्पष्ट असा आहे की, पाचव्या मजल्यावरती जाण्यासाठी लोकांना सक्त मनाई आहे. लोक बाकी कोणत्याही मजल्यावर जाऊ शकतात, परंतु पाचव्या मजल्यावर जाऊ शकत नाहीत. उत्तर कोरियाने याबाबत अतिशय कडक नियम बनवले आहेत, त्यानुसार जर एखादा परदेशी पाचव्या मजल्यावर गेला तर त्याला इथल्या तुरुंगात कायम स्वरूपी डांबून ठेवलं जात.

२०१६ मध्ये, ऑट्टो वॉरमबियर नावाचा एक अमेरिकन विद्यार्थी यंगाकडो हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर गेला, त्यानंतर उत्तर कोरियाच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर त्याने एक पोस्टर उखडून टाकल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात आला होता. त्यानंतर, ऑट्टो वॉरम्बियरवर खटला चालविला गेला आणि त्याला १५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. इतकेच नाही तर चौकशीदरम्यान त्याला खूप त्रास दिला गेला तथापि, नंतर त्याला सोडण्यात आले होते, परंतु दिलेल्या त्रासामुळे अमेरिकेत परत आल्यानंतर तो कोमामध्ये गेला आणि जून २०१७ मध्ये त्याचे निधन झाले.

त्या हॉटेलमध्ये राहिलेले आणखी एक अमेरिकन नागरिक कॅल्व्हिन सन यांच्या म्हणण्यानुसार, यंगाकडो हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील लहान खोल्या बंकरप्रमाणे बांधल्या गेल्या आहेत आणि बर्‍याच खोल्यांना कुलूप आहे. खोल्यांच्या भिंतींवर अमेरिकन-विरोधी आणि जपानविरूद्धची पेंटिंग्ज कायम आहेत. काही फोटो उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन त्यांचे वडील किम जोंग इल यांचे आहेत. असे म्हणतात की, तेथील प्रत्येक चित्रात असे लिहिले होते की, ‘अमेरिकेत बनवलेली प्रत्येक वस्तू आपली शत्रू आहे. आम्ही अमेरिकेवर हजार वेळा सुद्धा सूड उगावू शकतो. मात्र सर्वात आश्चर्याची बाब अशी कि, उत्तर कोरिया सरकारचा असा दावा आहे कि, यंगाकडो हॉटेलमध्ये पाचवा मजलाच नाही. आता तिथे गेलेल्यांचा दावा आणि उत्तर कोरियाच्या सरकारचा दावा हे स्वत: मध्ये एक गूढ निर्माण करण्यासारखं आहे. यातील काय खरं आणि काय खोट हे अजूनही स्पष्ट नाहीये.