उकाड्यात महागाईचे चटके; गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

0
467

मुंबई, दि. १ (पीसीबी) – वाढत्या उकाड्यांने हैराण झालेल्या नागरिकांना महागाईचे चटके बसू लागले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर २५ रूपयांनी महाग झाला  आहे.  तर अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत १ रूपया २३ पैशांची वाढ झाली आहे.  

दिल्लीत १ जूनपासून अनुदानित सिलिंडरचा दर ४९७ रुपये ३७ पैसे इतका झाला आहे. तर मुंबईतील  अनुदानित सिलिंडरची किंमत ४९५ रुपये ९ पैसे इतकी झाली आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रूपया कमकुवत झाल्याने सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत, असे पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटले आहे.

मुंबईत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ७०९ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. तर  दिल्लीत अनुदानित सिलिंडरची किंमत ४९७ तर मुंबईत ४९५ रुपये ९ पैसे तर कोलकात्यामध्ये हा दर ५०० रुपये ५२ पैसे इतका झाला आहे. तर चेन्नईत ४८५ रुपये २५ पैसे इतकी आहे. १ एप्रिलला गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. अनुदानित सिलिंडर मिळत असलेल्या कुटुंबाला वर्षाला १२ सिलिंडर मिळतात आणि सबसिडीचे पैसे बँक खात्यात जातात.