ईशान, टिवाटियाचा भारतीय संघात समावेश

0
230

मुंबई, दि. 21 (पीसीबी) : इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी २० सामन्यांच्या मालिकेसाठी आयपीएलमध्ये आपली छाप उमटविणाऱ्या ईशान किशन आणि राहुल टिवाटिया यांचा भारताच्या १९ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका अहमदाबाद येथे सरदार मोटेरा स्टेडियमवर पार पडणार आहे. मालिकेतील पहिला सामना १२ मार्च रोजी होणार आहे.

या मालिकेसाठी निवडलेल्या संघात इशान आणि टिवाटियासरह सूर्यकुमार यादव, वरुण चक्रवर्ती या अन्य आयपीएल गाजविणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतीतून सावरलेल्या भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, नवदीप सैनी यांनाही संघात स्थान दिले आहे. निवड झालेल्या या प्रत्येक खेळाडूने आयपीएलमध्ये आपली छाप पाडली आहे. पण, इशानचे वेगळेपण म्हणजे त्याने आजच सुरु झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत झारखंडकडून खेळताना मध्यप्रदेशाविरुद्ध ९४ चेंडूंत १७३ धावांची तुफानी खेळी केली.

संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहल टिवाटिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर