ईडी करणार आता सुशांतच्या बॉडीगार्डची सुद्धा चौकशी

0
296

मुंबई,दि.१३(पीसीबी) : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला २ महिने पूर्ण होतायत. अद्यापही सुशांतचने आत्महत्या का केली? याबद्दल ठोस कारण हाती लागत नाहीये. आत्तापर्यन्त बॉलिवूडच्या बड्या बड्या लोकांची चौकशी झाली आणि अद्यापही चौकशी सुरु आहे. दररोज नवीन खुलासे होत आहेत. आता ईडी सुशांतच्या बॉडीगार्डची देखील चौकशी करणार असल्याचं समोर येतंय.

आता ईडीने सुशांतच्या बॉडीगार्डला चौकशीसाठी बोलावलं आहे. सुशांतसोबत काम करत असताना त्याच्या आर्थिक व्यवहारात किंवा प्रोजेक्टवरती काम करताना किंवा अन्य कुठल्या हालचालींमध्ये अचानक बदल जाणवला का ? सुशांतमध्ये नेमका काय बदल दिसला? यासंदर्भात बॉडीगार्डचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. आता ईडी पुढील चौकशी सुशांतची बहीण आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी ची देखील चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.