‘इथे मृत्यू स्वस्त झालाय’; रस्त्यावरच लोकांचा जातोय जीव; प्रत्येक क्षणाला चालू आहे ‘श्वासा’साठी लढाई

0
631

उत्तरप्रदेश, दि.०७ (पीसीबी) : वाराणसीची परिस्थिती अशी आहे की सर्व रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरली आहेत. आता नवीन रूग्णांना सहजपणे बेड घेणे अवघड झाले आहे. हॉस्पिटलमध्ये बेड्स सोबतच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे संकटही तीव्र होत आहे. लोक औषधांसाठीही भटकत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोनामुळे येथे दररोज 10 ते 20 जणांना जीव गमवावा लागत असला तरी त्याउलट स्मशानभूमीत मृतदेहांच्या अंतिम संस्कारासाठी लांब रंग लागल्या आहेत. स्मशानाच्या घाटावर अंत्यसंस्कारांसाठी अक्षरशः प्रतीक्षा यादी तयार केली जात आहे. शहरातील अंतर्गत दफनभूमीही पूर्ण भरली असल्याने परिणामी लोक आता लोक शहराच्या बाहेरील भागात मृतदेह पुरत आहेत.

गोरखपूरमध्ये दररोज रुग्णालयात बेड मिळण्याच्या प्रतीक्षेत लोक मरत आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी एकूण १५०० बेड असून त्यापैकी रोज सुमारे १५ बेड रोज रिकामे होतात. तथापि, रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. यापैकी जवळपास १०% रूग्णांना व्हेंटिलेटर बेड देखील आवश्यक आहेत, परंतु ते देखील उपलब्ध नाहीत. सरकारी आकडेवारीत मृतांचा आकडा कमी असला तरी स्मशानभूमींवर दिवसा-रात्र अंत्यसंस्कार केले जातात.

राजधानी लखनौमध्ये नवीन कोरोना रूग्णांची संख्या कमी होऊ लागली असली तरी रुग्णालये आणि स्मशानभूमींतील दृश्य जैसे थे आहेत. स्मशान घाटांवर अजूनही मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी लांबच लांब रांगा दिसत आहेत. रात्रंदिवस अंत्यसंस्कार होत आहेत. जेव्हा त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा सरकारने घाटांवर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर बंदी घातली. तथापि, वाद वाढल्यानंतर सरकारने आपला निर्णय मागे घेतला.

झांसीमध्येही मृत्यूच्या आकडेवारीत सरकारी यंत्रणेकडून फेरबदल केले जात आहेत. येथे दररोज ५ ते ८ लोकांच्या मृत्यूची नोंद केली जात असून स्मशानभूमीत एकाहुन जास्त मृतदेह त्यात आहेत. म्हणजे दर तासाला एक माणूस मरत आहे. अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नाही. नंदनपुरा आणि बडगाव गेटचे बाहेर दररोज २२-३० मृतदेह स्मशानभूमी घाटावर पोहोचत आहेत. दिवस रात्री येथे अंत्यसंस्कारही केले जात आहेत.