आसाराम बापूला कोरोना पॉझिटिव्ह; तुरुंगात इतर कैद्यांना सुद्धा कोरोनाची लागण

0
190

जोधपूर, दि.०६ (पीसीबी) : कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. आसाराम बापूला देखील करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. त्याला जोधपूरमधल्या एमडीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून ते अतिदक्षता विभागात आहेत. आसारामबापू सध्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तुरुंगातल्या इतर १२ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचं कळत आहे. आसाराम बापूला गेल्या काही दिवसांपासून करोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक तपासणीनंतर त्याला आयसीयूत दाखल करण्यात आलं.