आळंदीत महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

0
828

आळंदी, दि. १८ (पीसीबी) – नणंद आणि नंदावीसोबत दुचाकीवरुन जात असताना मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनीमंगळसुत्र आणि ७२.२५० वजनाची सोन्याची मोहनमाळ असा एकूण २ लाख ६५ हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला. ही घटना सोमवारी (दि.१७) रात्री साडेआकरच्या सुमारास आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील शांताताई मेमोरिअल स्कुलजवळील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील अज्ञात दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआकरच्या सुमारास आळंदी पोलीस ठाणे हद्दीतील शांताताई मेमोरिअल स्कुलजवळील रस्त्यावरुन फिर्यादी महिला या त्यांच्या नणंद आणि नंदावीसोबत दुचाकीवरुन जात होत्या. यावेळी मागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनीमंगळसुत्र आणि ७२.२५० वजनाची सोन्याची मोहनमाळ असा एकूण २ लाख ६५ हजारांचा ऐवज जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.