आली रे आली आता ‘माझी’बारी आली! अभिनेते प्रकाशराज लोकसभा लढवणार

0
464

बंगळुरू , दि. १ (पीसीबी) – आपल्या अनोख्या शैलीत संवादफेक करत खलनायक रंगवणारे ‘सिंघम फेम’ अभिनेते प्रकाश राज लवकरच  राजकारणात प्रवेश करणार आहेत. तसेच ते आगामी लोकसभा निवडणूकही लढवणार आहेत, अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे. दरम्यान, प्रकाशराज कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, याबाबत स्पष्ट केलेले नाही.