आरबीआय चोर है! पीएमसी खातेधारकांच्या हायकोर्टाच्या आवारात घोषणा

0
546

मुंबई,दि.१९ (पीसीबी)- पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान खातेधारकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. पीएमसी बँकेच्या खातेदारांनी आरबीआय चोर है अशा घोषणाही दिल्या.  हमारा पैसा वापस कर दो आरबीआय अशाही घोषणा देण्यात आल्या. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत काय होणार याकडे खातेदारांचं लक्ष लागलं होतं. अशात ही सुनावणी ४ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आरबीआय विरोधात खातेदारांनी घोषणाबाजी केली.

पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर आरबीआयने खातेदारांना त्यांच्याच खात्यातून पैसे काढण्यासंदर्भात निर्बंध घातले होते. त्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. पीएमसी बँकेतील खातेदारांना तातडीने पैसे मिळावलेत आणि त्यांना त्यांचे लॉकर हाताळता यावेत यासाठी एक नियमावली करण्यात यावी अशी विनंती शिवसेनेने केली होती. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती.