आय.एम.ए पिंपरी-चिंचवड भोसरी शाखेच्या अध्यक्षपदी डॉक्टर संजीव दाते

0
203

पिंपरी, दि.२१ (पीसीबी) : आय.एम. ए .पी.सी.बी. च्या दिनांक 20 मार्च 2021 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये डॉक्टर संजीव दाते यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली व सर्व नवीन कार्यकारणीची देखील बिनविरोध निवड करण्यात आली.

दिनांक 13 एप्रिल 2021 ला गुढीपाडव्याच्या दिवशी आय एम पी सी बी च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मावळते अध्यक्ष डॉक्टर सुहास माटे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर संजीव दाते यांच्याकडे आय एम ए पीसीबी ची सूत्रे सोपवली. डॉक्टर संजीव दाते हे गेले तीस वर्षापासून चिंचवड येथील सुप्रसिद्ध सर्जन म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी या आधी पी. सी. डी. ए., रोटरी क्लब ऑफ चिंचवड , पुणे सर्जिकल सोसायटी या प्रसिद्ध सामाजिक व वैद्यकीय संस्थांचे अध्यक्षपद भूषवले होते. एक हुशार कर्तव्यदक्ष प्रामाणिक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून पिंपरी चिंचवड भागात प्रसिद्ध आहेत.

आय. एम. ए. पी.सी.बी. ची नवीन कार्यकारणी खालील प्रमाणे–
पॅटरन डॉक्टर दिलीप कामत, अध्यक्ष डॉक्टर संजीव दाते,
नियोजित अध्यक्ष डॉक्टर विजय सातव, उपाध्यक्ष डॉक्टर माधव कुलकर्णी आणि डॉक्टर सौ. माया भालेराव, सचिव डॉक्टर मंदार डोईफोडे, खजिनदार डॉक्टर हेमंत पाटील, मावळते अध्यक्ष डॉक्टर सुहास माटे.
इतर सभासद—डॉक्टर संजय देवधर डॉक्टर सुधीर भालेराव डॉक्टर शुभांगी कोठारी, अर्चना जाधव, डॉक्टर चंद्रकांत वाळके डॉक्टर प्रसाद भातलवंडे डॉक्टर राकेश नेवे, डॉक्टर सोनावणे इत्यादी.