आम्ही फक्त सत्तेत आहोत आर्थिक नितीत नाही – संजय राऊत

0
398

दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – आम्ही फक्त सत्तेत आहोत आर्थिक नितीत नाही, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी देशातील आर्थिक मंदीवर बोलताना भाजपकडे बोट दाखवले आहे. एका वृत्त वाहिणीच्या मुलाखती दरम्यान ते बोलत होते.

तसेच देश आर्थिक अराजकतेच्या खाईत कोसळत आहे. शतकातील सर्वात मोठी मंदी लाखो नोकऱ्यांचा घास घेत आहे. चांद्रयान सोडले, ३७० हटवले, सर्जिकल स्ट्राईक केले ही देशाभिमानाची गोष्ट आहे परंतू बेरोजगारीवर हे उत्तर नाही, असे आजच्या सामनातून संजय राऊत म्हणाले. त्यावरूनच माध्यमांना प्रतिक्रिया देताना आम्ही फक्त सत्तेत आहोत आर्थिक नितीत नाही, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे. तर बिघडलेल्या अर्थव्यवस्थेची घडी देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री लवकरच पूर्वपदावर आणतील, असा विश्वास देखील राऊतांनी यावेळी व्यक्त केला.