आमदारकीचा राजीनामा देणार नाही; प्रकाश सोळंके यांच स्पष्टीकरण

0
479

मुंबई,दि.३१(पीसीबी) – सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा प्रकाश सोळंके याना होती, मात्र त्यांना डावलले गेल्याने ते नाराज होते, मात्र राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांची नाराजी दूर झाली आहे.

ते आमदाराकीचा राजीनामा देण्याच्याही तयारीत होते. मात्र त्यांना आज मुंबईत बोलवण्यात आलं. मुंबईत त्यांच्याशी जयंत पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार यांनी चर्चा केली. शरद पवार यांनीही सोळंके यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. ज्यानंतर पत्रकारांशी बोलताना माझी नाराजी दूर झाली असून राजीनामा देणार नसल्याचं सोळंके यांनी जाहीर केलं.

माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी भाजपचे रमेश आडसकर यांचा पराभव केला होता. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारत त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना डावलले गेल्याने सोळंके नाराज होते, त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची वेळ घेतली होती व आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत अशी चर्चा होती. राष्ट्रवादीचे वाईचे आमदार मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मंत्रिपद वाटपावरून राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे.