आमच्या जाहीरनाम्यात कोणतीही खोटी घोषणा नाही; राहुल गांधींचा भाजपला टोला

0
512

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचा जाहीरनामा आज (मंगळवार) प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा केल्या असून आमच्या जाहीरनाम्यात  कोणतीही घोषणा खोटी नाही, असा दावा करून  राहुल गांधी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा  सोनिया गांधी, माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री  पी.चिदंबरम यांच्या उपस्थितीत  जाहीरनामा प्रसिद्ध  करण्यात आला.  या जाहीरनाम्यात अनेक महत्वाची आश्वासने देण्याता आली  आहेत.

देशातील १२१ ठिकाणी भेटी देऊन काँग्रेसच्या जाहीरनाम्याची निर्मिती  करण्यात आली आहे, अशी माहिती पी.चिदंबरम यांनी यावेळी दिली.  सर्वसमावेशक जाहीरनामा असून सर्व घटकांचे हित डोळ्यासमोर या जाहीरनाम्यात आश्वासने देण्यात आली आहेत.