‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतो आहे’, धनंजय मुंडेंचं भावनिक ट्विट

0
724

महाराष्ट्र, दि.१२ (पीसीबी) –  भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती असून त्यानिमित्त बीडमधील गोपीनाथ गडावर समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्वाभिमान दिवस असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले असून यावेळी पंकजा मुंडे यांच्यासहित भाजपा, शिवसेनामधील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी होणाऱ्या या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विटच्या माध्यमातून आठवणी जागवत विनम्र अभिवादन केले आहे.

धनंजय मुंडे यांनी याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे औरंगाबादमधील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी मागणी केली. ट्विटच्या माध्यमातूनच त्यांनी ही माहिती दिली होती.