आपल्या घरावर आयकर विभागाचा छापा पडणार आहे – पी चिदंबरम्

0
505

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – ऐन निवडणुकीच्या काळात देशभरात आयकर विभागाने छापेमारी करण्यास सुरूवात केली आहे. यावर काँग्रेस नेते व माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम्‌ यांनी  आपल्या घरावर आयकर विभाग छापा टाकणार आहे, असा दावा ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

पी चिदंबरम यांनी म्हटले आहे की,  चेन्नई आणि माझ्या शिवगंगा मतदारसंघातील घरावर आयकर विभाग छापा टाकणार असल्याचे मला समजले आहे. आम्ही शोध पथकाचे स्वागत करु. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही, हे आयकर विभागालाही माहिती आहे. निवडणूक प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी हा छापा टाकला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, आयकर विभागाने रविवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्ली आणि मध्य प्रदेशातील ५२ ठिकाणांवर छापे घातले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने सरकारी संस्थांना मतदानपूर्व छाप्यांबाबत निष्पक्ष कारवाईची सूचना केली आहे.