आपले पंतप्रधान कधी कोणती नाट्यछटा सादर करतील याचा नेम नाही – शिवसेना

0
399

मुंबई,दि.४(पीसीबी) – आपले पंतप्रधान कधी कोणती नाट्यछटा सादर करतील याचा नेम नाही, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटनंतर ते सोशल मीडिया सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र नंतर त्यांनी त्याबाब स्पष्टीकरण दिलं. यावरून शिवसेनेनं अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

अग्रलेखात म्हटलं आहे कि, आपले पंतप्रधान मोदी हे अभिनयनिपुण आहेत. त्यामुळे ते कधी कोणती नाटय़छटा सादर करतील याचा नेम नाही. मोदी यांनी लागोपाठ दोन दिवसांत केलेल्या दोन वेगवेगळय़ा ट्विटमुळे असंच नाट्य निर्माण झालं. नंतर हा सस्पेन्स मोदींनी संपुष्टात आणला.

मोदी यांनी सोमवारी अचानक जाहीर केले की, ‘सोच रहा हूं इस रविवार से सोशल मीडिया छोड दूं’ समाजमाध्यमांचा त्याग करण्याच्या त्यांच्या घोषणेने मोदीभक्तांच्या छातीत कळा वगैरे आल्या. पण काही तासांच्या या वेदना मोदींच्या दुसऱया ट्विटनंतर कमी झाल्या, असा टोला शिवसेनेनं लगावलाय.