आपले नांव मतदार यादीत आहे की नाही; ‘असे’ तपासून पहा !

0
691

मुंबई, दि. १ (पीसीबी) – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी  २१ ऑक्टोबरला  मतदान होणार आहे.  तर २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.  प्रत्येक नागरिकाने मतदान करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच मतदार यादीत आपले नांव असल्याची खात्री करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे फक्त चार स्टेपद्वारे तुम्ही   तपासून पाहू शकता.

सर्वप्रथम निवडणुक आयोगाच्या National Voters पोर्टलवर जा

डाव्या साईडला एक सर्चबार असेल.

त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल, तो व्यवस्थित वाचा आणि पुढे जा

त्यामध्ये सर्व माहिती भरा आणि सबमिट बटनवर क्लिक करा

तुमची मतदार यादीमधील सर्व माहिती येईल

डाव्याबाजूला आणखीवर क्लिक केल्यास मतदान ओळखपत्रावरील सर्व माहिती येईल

मतदार असलेल्या व मतदार नसलेल्या नागरिकांच्या माहितीसाठी व्हीव्हीआयपी हा एक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार जे मतदार आहेत, त्यांना मतदार यादीतील आपल्या नावाची पडताळणी करून घेण्यासाठी १९५० ही टोल फ्री हेल्प लाइन सुरू करण्यात आली आहे. जे मतदार नाहीत, त्यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून नमुना-६ फार्म डाऊनलोड करून तो पूर्ण भरून मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्र (बूथ) अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.