आधी बारामती हातात येऊ द्या, मग पुढचे लक्ष्य ठरवू – चंद्रकांत पाटील

0
564

पुणे, दि. २ (पीसीबी) – ‘आधी बारामती हातात येऊ द्या, मग पुढचे लक्ष्य ठरवू’, असे सुचक विधान राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवार) येथे केले. लोकसभा निवडणुकीत  पश्चिम महाराष्ट्रातील  लोकसभेच्या  दहा जागांवर आमचे विशेष लक्ष आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

महायुतीचे  पुण्यातील लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट व बारामतीच्या  उमेदवार कांचन कुल यांचा आज उमेदवारी अर्ज  दाखल करण्यात आला.  यावेळी भाजपसह महायुतीचे  सर्व नेते  व कार्यकर्ते उपस्थित होते.  त्यानंतर  पाटील बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्यात काँग्रेसला अनेक चर्चेच्या फेऱ्या  करूनही सक्षम उमेदवार देता   आलेला नाही. अखेरच्या दिवशी काँग्रेसला  उमेदवार जाहीर करावा लागला. तर दुसरीकडे सांगली लोकसभेसाठी  वसंतदादांच्या नातवाला स्वाभिमानीची बॅट हातात घ्यावी लागली आहे. यावरून काँग्रेसची काय अवस्था  झाली हे दिसून येते, असे पाटील  म्हणाले.