‘आता रिक्षा वाचवणे तुमच्या हातात’- बाबा कांबळे

0
331

पिंपरी, दि.२३ (पीसीबी) : covid-19 मुळे रिक्षा व्यवसायाचे अस्तित्व धोक्यात आले आहे, गेली अनेक महिन्यापासून रिक्षा व्यवसाय बंद आहे, रिक्षा चालवल्याशिवाय घरातील चूल पेटत नाही, अशी रिक्षाचालकांची अवस्था आहे हातावर पोट असणारा हा घटक गेल्या आठ महिन्यांपासून काय करत असेल, तो कसा जगत असेल, याबाबत साधी विचारपूस देखील कोणी करत नाही, कर्ज काढून रिक्षा घेतली रिक्षा चे हप्ते कसे भरायचे यात फायनान्स कंपनीच्या गुंडांचा वसुलीसाठी होणारा सततचा त्रास अशा असंख्य प्रश्नांचे सध्या रिक्षाचालक ग्रासला आहे, अनेकांनी रिक्षा बंद ठेवून मजुरी काम, फळभाजी विकणे अशी कामे सुरू केली आहेत,अशा अत्यंत बिकट परिस्थितीत रिक्षाचालक असून रिक्षा हे वाहन नामशेष होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,

यातच आशेचा किरण म्हणजे परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे हे अत्यंत कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, सामाजिक भान असलेले अधिकारी महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत रिक्षाचालकांन बद्दल सामाजिक दृष्टिकोन ठेवत त्यांनी रिक्षाचालकांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे यामुळे रिक्षाचालकांचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशा निर्माण झाली आहे,

त्यामुळे पुणे येथील रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधीनी मुंबई येथे जाऊन डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेऊन रिक्षाचालकांचे प्रश्नांबाबत चर्चा केली, आणि यावे रिक्षाची प्रतिकृती डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे देत आता रिक्षाचे भवितव्य तुमच्या हातात आहे तुम्ही रिक्षा व्यवसाय वाचवू शकतात अशी भावना व्यक्त केली,

यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे उपाध्यक्ष आणि समर्थ शिक्षा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद तांबे, पुणे रिक्षा फेडरेशनचे प्रदीप भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या अनिता सावळे, आदी उपस्थित होते,

यावेळी बाबा कांबळे म्हणाले कोरोनामुळे रिक्षाचालकांचे जगच बदलले आहे रिक्षा व्यवसाय आणि रिक्षा चालक आर्थिक अडचणी मध्ये आहे रिक्षा व्यवसाय बाबत नव्याने धोरण ठरवावे लागेल आणि भविष्यात धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील तरच रिक्षा व्यवसाय जिवंत राहील यासाठी प्रशासन पातळीवरील अधिकारी यांचे सहकार्य अपेक्षित आहे त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही.