आता जितेंद्र आव्हाडांनी दिला शिवसेनेला पाठिंबा का वाचा…

0
455

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्ष तोडण्यास विरोध केल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. झाड तोडण्याबाबत वृक्ष प्राधिकरण समितीकडे रखडलेला प्रस्ताव शिवसेनेला धोबीपछाड करत काल भाजपने मंजूर करुन घेतला.

आरेमधील झाड तोडण्याच्या मुद्यावर मी मुंबईमधील सर्व वृक्षप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांना उघडपणे समर्थन देतो. मी या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा देतो. अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आपण या सर्व मुद्द्यांबाबत काळजी करायला हवी आणि राजकारण सोडून एकत्र यायला पाहिजे, अशा आशयाचं ट्वीट आव्हाड यांनी केलं आहे.

आरे हे ऑक्सिजन देणारे वन आहे. अॅमेझॉनच्या जंगलाविषयी आता आपल्याला समजत आहे. जसं तिथे लागलेल्या आगीचा फटका फक्त ब्राझील नाही, तर संपूर्ण जगाला बसणार आहे. तसं वृक्षतोडीचे गंभीर परिणाम फक्त मुंबईच नाही, तर महाराष्ट्राला भोगावे लागणार आहेत. आदित्य ठाकरेंसोबत मी स्वतः फिरायला तयार आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन पर्यावरणासाठी हे करायला मी तयार आहे. ही माझी राजकीय भूमिका नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीने वैयक्तिक भूमिका आहे, असेही आव्हाड म्हणाले.