आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या नानावटी रुग्णालयात

0
255

 

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेते अभिषेक यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याला देखील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या चौघांना ही कोरोना ची लागण झाली होती. मात्र, ऐश्वर्या आणि आराध्याला लक्षणे नसल्याने घरीच होम क्वॉरंटाईन करण्यात आले होते. मात्र, आज ऐश्वर्याला ताप आणि घशात त्रास होऊ लागला तेव्हा त्यांना संध्याकाळी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळते आहे.

ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्य या दोघींनाही सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीचं क्वॉरंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र, आता काही उपचारासाठी ऐश्वर्याला रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे.

अमिताभ बच्चन आणि कुटुंबियांच्या प्रकृतीत सुधारणा

कोरोनाची लागण झाल्यामुळे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये शनिवारपासून दाखल असलेले अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या तब्येतीत सुधारणाही होत आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अमिताभ यांना कफचा त्रास होत होता. आता त्यांचा त्रास 90 टक्क्यांनी कमी झाला आहे. अमिताभ यांची ऑक्सिजन लेव्हलही आता सामान्य आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होत आहे.