आता अहमदनगरचे नामांतर `अहिल्यानगर`

0
235

अहमदनगर, दि. २५ (पीसीबी) – केंद्र सरकारने काल (शुक्रवारी) औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराला मंजुरी दिली. त्यामुळे लवकरच औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर झालं आहे तर उस्मानाबादचं नाव धाराशिव झालं आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरानंतर आता अहमदनगरच्या नामांतराबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत सूचक वक्तव्य केलं आहे.

छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिवनंतर आता अहमदनगरच्या नामकरण करण्यासाठी भाजप गोटात सुरू हालचाली सुरू झाल्या आहेत. अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली होणार, असं ट्विट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. पडळकर यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पडळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन.त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात होणारच असं ट्विट केलं आहे.

दरम्यान, पडळकर यांनी याआधीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ असे करा, अशी मागणी केली होती. त्यांनी पत्र लिहून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.