आकुर्डीतील सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शुभारंभ….

0
185

पिंपरी, दि. 3 (पीसीबी) – राज्याच्या नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात विकास कामे करण्यासाठी आत्तापर्यंत 10 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आकुर्डीतील सुभश्री गृहनिर्माण सोसायटीमध्ये 30 लाख रुपयांचे सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गृहनिर्माण सोसायटीतील जुने झालेले ब्लॉक काढून तिथे काँक्रीटीकरणाचे काम केले जाईल. नागरिकांना चांगले रस्ते मिळतील, असे खासदार बारणे म्हणाले.

 

या प्रसंगी माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, स्थानिक नगरसेवक प्रमोद कुटे, वैशाली सुर्यवंशी, वैशाली मराठे, महिला संघटिका ॲड.उर्मिला काळभोर आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यातील 30 लाख रुपयांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरातील विकास कामांसाठी निधी मिळविण्याकरिता माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा केला. त्याला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यात शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत आहे”.

”राज्य सरकारकडून पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कामासाठी मोठा निधी दिला जात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात काम करण्यासाठी आत्तापर्यंत 10 कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाने दिला आहे. त्यापैकी 30 लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या निधीतून आणखी कामे केली जाणार असल्याचे” खासदार बारणे म्हणाले.