आंनद सहकारी बँकेत 74 कोटींचा घोटाळा; 14 संचालकांवर गुन्हा दाखल

0
288

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – श्री आंनद सहकारी बँकेच्या चिंचवड शाखेत 74 कोटी 24 लाख 62 हजार 862 रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पत नसतानाही बोगस कर्ज वाटप केल्या प्रकरणी 14 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2017 ते 2018 या कालावधीत बँकेच्या चिंचवड शाखेत घडला.

सनदी लेखापाल गणेश सदाशिव काकडे ( वय 58, रा. नारायण पेठ, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी विनय देवरत्न शिवदास, चेअरमन माणिक सखाराम गायकवाड, व्हाईस चेअरमन अभय नारायण जोशी, संचालक सुधाकर दत्तात्रय घोरपडे, संचालक अरविंद विनायक देशपांडे, संचालक पराग चंद्रकांत काळकर, संचालक आशा प्रकाश बोकील, संचालक धनंजय वसंत खानकल, संचालक शितल निरंजन सपकाळ, संचालक ज्ञानेश्ववर यशवंत शिंदे, शशिकांत ज्ञानदेव लोखंडे, कल्याण चांगदेव साळुंखे, प्रकाश राजाराम पाटील, रमेश पन्नालाल रांका आणि इतर कर्जदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या संचालकानी स्वतःच्या पदाचा गैरवापर करून सन 2017 ते 2018 या आर्थिक वर्षात कर्जदार मारुती निवृत्ती नवले, निमको अडव्हर्टटायझिंग अँड एंटरटेनमेंट ली. निमको हॉटेल अँड रिसॉर्ट ली. निमको ट्रेडर्स लिमिटेड यांनी आपसात संगनमत करून बँकेत गैरव्यहार केला. कागदपत्रांची कोणतीही छाननी न करता पत नसताना कर्जदारांना कर्ज दिले. एकूण 74 कोटी 24 लाख 62 हजार 832 इतकी रक्कम संचालकांच्या मंजुरीने वितरित करण्यात आली. ही रक्कम इतर वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.