अहिल्यादेवी होळकर यांना पिंपरी महापालिकेच्या वतीने अभिवादन  

0
869

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने महापौर राहूल जाधव यांनी मोरवाडी आणि सांगवी येथील त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

मोरवाडी येथे आज (गुरूवार) सकाळी झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर क्रिडा, कला, साहित्य व सांस्कृतिक सभापती तुषार हिंगे, नगरसेविका  आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, उपअभियंता विजय भोजणे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण रुपनर, सदाशिव पडळकर, माणिकराव बारगळ, नागेश तितर, भुजंग दुधाळे, अजित चौधरी, विकास माने आदी उपस्थित होते.

सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमास ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माई ढोरे, आशा धायगुडे – शेंडगे, नगरसेवक संतोष कांबळे, हर्षल ढोरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, बाबासाहेब चितळकर, सुधाकर सुर्यवंशी, सचिन सरक, नारायण मदने, अभिमन्यू गाडेकर, मनोजकुमार मारकड, दिनेश गाडेकर, विठठल वागदरे, भालचंद्र मेटी,  माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक  रमेश भोसले आदी उपस्थित होते.