असं वाटतंय की मी खूप वाईट स्वप्न पाहतोय. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी खूप चटका लावणारी आहे – अक्षय कुमार

0
351

मुंबई,दि.३०(पीसीबी) – असं वाटतंय की मी खूप वाईट स्वप्न पाहतोय. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी खूप चटका लावणारी आहे, असं प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार म्हणाला आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने अक्षय ने ट्विटरवरून शोक व्यक्त केला आहे.

काल दिवशी इरफान खान आणि आज ऋषी कपूर यांच्या जाण्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. इरफान खान यांच्या दुखा:तून बॉलिवूडवासी आणि त्याचे करोडो चाहते बाहेर पडत नाहीत तोपर्यंतच ऋषी कपूर कायमचं हे जग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले आहेत. अक्षय कुमारला ऋषी कपूर यांच्या जाण्याने फार दु:ख झालं आहे. “असं वाटतंय की मी खूप वाईट स्वप्न पाहतोय. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी खूप चटका लावणारी आहे. मी या वृत्ताने खूप निराश झालो आहे. ऋषी कपूर यांंचं जाणं माझ्यासाठी अत्यंत दुख:द आहे, असं अक्षयने म्हटलं आहे. ऋषी कपूर खूप चांगले मित्र होते. माझ्या कुटुंबाचे ते खूप जवळचे होते. त्यांच्या जाण्याने मला खूप मोठा धक्का बसला आहे. मी कपूर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांना आदरांजली, असं अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही ऋषी कपूर यांच्या निधनानंतर एक भावूक ट्विट केलं आहे. तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. या ट्विटमधून त्यांची अवस्था काय झाली आहे, हे दिसून येत आहे.