अमेरिकास्थित डॉ. दिनेश पायमोडे या मुळच्या महाराष्ट्रीय शास्त्रज्ञाची कोवीड-१९ वरील औषधनिर्मितीत आणखी एक कौतुकास्पद कामगिरी

0
455

विदेश,दि.३१(पीसीबी) – अमेरिकेतील ‘Medicines for All Institute’ या औषधनिर्माण शास्रातील प्रतिष्ठित संशोधन संस्थेमध्ये ‘संशोधक शास्त्रज्ञ’ पदावर कार्यरत असलेले, पुण्याचे सुपुत्र डॉ. दिनेश जगन्नाथ पायमोडे यांनी COVID-19 वर प्रभावी अशा ‘Molnupiravir’ या सध्य:स्थितीत वैद्यकीय चाचणी रुपातील विषाणूरोधी (Antiviral Investigational Drug) औषधाची निर्मिती प्रक्रिया विकसित केली आहे. त्यांचे हे संशोधन, अमेरिकेन केमिकल सोसायटीच्या ‘Organic Process Research and Development (OPR&D)’ या रसायनशास्रातील प्रसिद्ध नियतकालिकात दि. २८ जुलै २०२१ रोजी प्रकाशित झाले. ह्या संशोधन प्रक्रियेत डॉ.दिनेश व त्यांच्या team ला ‘Bill and Melinda Gates Foundation’ या संस्थेने अर्थसाहाय्य केले.

काय आहे ‘Molnupiravir’ drug?
‘Molnupiravir/ MK-4482/ EIDD-2801’ हे सर्वप्रथम अमेरिकेतील Emory University तील ‘DRIVE’ या औषधनिर्माण संशोधन संस्थेने प्रायोगिक तत्त्वावर ‘influenza/ the flue’ वरील उपचारांवर निर्मीत केलेले गोळीच्या स्वरूपातील तोंडाद्वारे दिले जानारे विषाणूरोधी औषध (Oral Antiviral drug) आहे. नंतर च्या काळात त्याचे पुढील संशोधन अमेरिकेतील Ridgeback Biotherapeutics ह्या कंपनीने चालू ठेवले. सद्ध्या Ridgeback Biotherapeutics व Merck & Co ह्या कंपन्या संयुक्तपणे COVID-19 वरील ‘Molnupiravir’ औषधाच्या मानवी चाचण्या (Phase 2/3 trials) घेत आहेत व त्यांचे निष्कर्ष हे सकारात्मक असल्याचे दिसून आले आहे.

या औषधाच्या चाचण्या ह्या केवळ कोविड पाॅझीटीव्ह आलेल्या कोरोनाच्या सौम्य ते मध्यम स्वरुपाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर केला जात आहे.

Merck- Ridgeback Bio च्या Phase 2a clinical trial च्या निष्कर्षानुसार, ह्या औषधाच्या सेवनाने काही दिवसांतच कोरोना झालेला रूग्न बरे झाल्याचे अभ्यासादरम्यान निदर्शनास आले. भारतातील देखील बहुतेक औषध कंपन्यांनी या औषधाच्या मानवी चाचण्यांची परवानगी DCGI (Drug Controller General of India) कडून मिळवली आहे व त्यांच्या चाचण्यांचे देखील सकारात्मक परिणाम आल्याचे दिसून आले आहे. तथापि, या औषधाच्या Phase 2 & 3 clinical trials पूर्ण होऊन त्याला FDA approval मिळण्यासाठी व त्याचा सर्वसामान्य जनतेला वापरात येण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल.

डॉ. दिनेश यांच्या संशोधनाची वैशिष्ट्य:
१) Molnupiravir मुळ उत्पादन प्रक्रियेत मिळणारे उत्पादन हे केवळ १७% होते. याउलट डॉ. दिनेश यांच्या प्रक्रियेत तेच उत्पादन वाढून ६०% पर्यंत पोहोचले.
२) अगोदरची मुळ उत्पादन प्रक्रिया ही ४-५ टप्प्यांची होती. तेच डॉ. दिनेश यांच्या संशोधनामुळे केवळ २ टप्प्यांमधे पुर्ण करता येणार आहे. परिणामी कमी वेळात Molnupiravir चे उत्पादन घेता येईल.
३) डॉ. दिनेश यांच्या संशोधनात कच्चा माल म्हणुन ‘सायटिडीन (Cytidine)’ नावाचे स्वस्त व मोठ्या प्रमाणात उपलब्ध असनारे रसायन वापरून Molnupiravir चे उत्पादन घेता येणार आहे. म्हणजेच काय तर या प्रक्रियेचा अवलंब केल्यास कमी खर्चात जास्त औषधनिर्मितीचे लक्ष साध्य करता येणार आहे.
४) या प्रक्रियेचा अवलंब करण्यास जगभरातील औषध कंपन्यांना कुठल्याही प्रकारच्या मर्यादा घालण्यात आलेल्या नाही. परिणामी या औषधाचे कमी खर्चात जास्त उत्पादन होवून, औषधाच्या किमती नियंत्रित ठेवणे सोपे होईल व हा सर्वसामान्य गरीब जनतेला खुप मोठा दिलासा असेल. किंबहुना याद्वारे Bill and Melinda Gates Foundation आणि Medicines for All Institute ह्या संस्थांचा मानवजातीच्या कल्याणाचा उद्देश सफल होण्यास मदत होणार आहे.

डॉ. पायमोडे यांनी सप्टेंबर 2020 मध्ये ‘Remdesivir’ या Covid-19 वर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या निर्मितीमध्ये देखील महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती.
Dr. Dinesh यांच्या संशोधन कार्याचे आत्तापर्यंत 12 पेक्षा जास्त शोधनिबंध विविध अंतरराष्ट्रीय नियतकालीकांमध्ये प्रकाशीत झालेली आहेत. यामध्ये Cancer, HIV/AIDS, Hepatitis, Malaria आणि Covid-19 इत्यादी रोगांवरील औषधांच्या संशोधनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जून २०२१ मधे मलेरिया रोगावरील चाचणी रुपातील औषध ‘MMV048’ संशोधनातील महत्त्वपूर्ण संशोधन प्रकाशित झाले होते. 

पायमोडे दाम्पत्य! Dr. Dinesh यांच्या पत्नी डॉ. अर्चना ह्या देखील रसायनशास्त्रातील PhD holder असून सध्या Virginia Commonwealth University च्या Medicinal Chemistry Department मधे रसायनशास्त्र संशोधक (Post doctoral research fellow) म्हणून कार्यरत आहेत.