अमित शहा देशाचे गृहमंत्री; जाणून घ्या कोणाला कोणते मंत्रिपद

0
615

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काल (३० मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींसोबत ५७ सहकाऱ्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये कोणाला कोमते मंत्रीपद देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. त्यातच आता खाते वाटप झाले आहे.

कोणाला कोणते मंत्रिपद-

अमित शाह – गृहमंत्री

निर्मला सीतारमण – अर्थमंत्री

नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री

राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री

एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्री

अरविंद सावंत- अवजड उद्योग मंत्री

रावसाहेब दानवे- ग्राहक संरक्षण राज्यमंत्री

सदानंद गौड़ा – रसायन आणि उर्वरक मंत्रालय

नरेंद्र सिंह तोमर- कृषी मंत्री

रविशंकर प्रसाद- कायदा व न्याय मंत्री

स्मृति इराणी- महिला आणि कुटुंब कल्याण मंत्री

पीयूष गोयल- रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री

गिरिराज सिंह-पशुपालन मंत्री

रामदास आठवले- सामाजिक न्याय राज्यमंत्री